येरवडा: येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटीमधून वाहणाऱ्या पावसाळी नाल्यात जमा झालेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले. यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांमध्ये आजार बळावत आहेत, त्यामुळे या नाल्याची सफाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.
डॉ. आंबेडकर सोसायटीतून पावसाळी नाला वाहतो. या नाल्यामध्ये पावसाच्या पाण्यासह ड्रेनेजचे पाणीही वाहते. यातच परिसरातील अनेक नागरिक कचराही टाकतात. मात्र या नाल्याची नियमित सफाई होत नसल्याने सध्या प्रदूषित पाणी साचून राहीले असून, परिसरात मोठ्या प्रमाणात डास, मच्छरांचा उपद्रव वाढला आहे. शिवाय नाल्यांमध्ये झाडे-झुडपे मोठी प्रमाणात वाढली असल्यचाने येथील संरक्षक भिंत पडण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे नाल्याची साफसफाई करून प्रवाह सुरळीत करावा आणि औषध फवारणी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटीमधून वाहणाऱ्या पावसाळी नाल्यात जमलेला गाळ आणि ड्रेनेजचे पाणी यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. संध्याकाळी दारे-खिडक्या बंद ठेवाव्या लागत आहेत. डासांचे प्रमाण वाढले आहे. नाल्यातील दुर्गंधीचा वास घरामध्ये येत आहे.रवी मोहिले, रहिवासी