पुणे

Pune Rain Update : पुणे जिल्ह्यात बुधवारपर्यंत ’यलो अलर्ट’

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सुमारे 22 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस पिंपरी-चिंचवड व लोहगाव भागात (36 मिमी) झाला. दरम्यान, आगामी चार दिवस (27 सप्टेंबरपर्यंत) जिल्ह्याला यलो अलर्टचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.

शुक्रवारी संपूर्ण जिल्ह्यात बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावली. पाऊस दिवसभर संततधार सुरू होता तसेच शनिवारीही पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आणि दिवसभर पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात बहुतांश भागांत होता. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी 22 मिमी पावसाची नोंद झाली. पिंपरी-चिंचवडी व लोहगाव भागांत सर्वाधिक 36 मिमी
पावसाची नोंद झाली. पुणे वेधशाळेने 27 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण जिल्ह्याला यलो अलर्टचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यात 24 तासांत झालेला पाऊस (मिमी)

दौंड : 41, तळेगाव ढमढेरे : 33, निमगिरी : 21.5, आंबेगाव : 19, नारायणगाव : 13.5, पुरंदर 12, राजगुरुनगर 20, शिवाजीनगर 21,
हवेली : 12, चिंचवड : 36.5, लोहगाव : 36, पाषाण : 21.8

हेही वाचा

SCROLL FOR NEXT