देशाची लोकसंख्या 2027 पर्यंत पोहोचणार 148 कोटींवर!  Pudhari
पुणे

World Population Day 2025: देशाची लोकसंख्या 2027 पर्यंत पोहोचणार 148 कोटींवर!

लोकसंख्येत सरासरी 14 ते 15 टक्के वाढ होण्याचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

India to reach 148 crore population by 2027

आशिष देशमुख

पुणे: आपल्या देशाची जनगणना दर दहा वर्षांनी होते. त्या नियमानुसार ती 2021 मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र कोरोना महामारीमुळे ती 2025 पर्यंत होऊ शकली नाही. त्यामुळे आता ती 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

दैनिक पुढारी ने विविध स्त्रोतांच्या माहितीच्या आधारे देश आणि महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजाचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की, 2027 पर्यन्त नागरिकांच्या जीवनात अमुलाग्र बदल होतील. देशाची लोकसंख्या सुमारे 14 ते 15 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. 2011 च्या तुलनेत लोकसंख्या सुमारे 121 कोटीवरून 148 कोटींवर जाईल. (Latest Pune News)

गणितीय मॉडेलद्वारे लोकसंख्या शास्त्रज्ञांनी हा अंदाज काढला आहे.तसेच महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 11 कोटी वरून सुमारे 12.8 ते 13 कोटी पुढे जाईल असाही अंदाज तज्ञांनी दिला आहे. आपल्या देशाची लोकसंख्या 2011 सालच्या जनगणनेत 121 कोटी ( 1.21अब्ज ) नोंदली गेली होती मात्र 2027 पर्यन्त त्यात 14 ते 15% वाढ होऊन ती सुमारे 148 कोटी (1.48 अब्ज ) पर्यंत वाढेल असा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे.

येत्या काही दशकातच ती 170 कोटींवर जाईल. मात्र यानंतर लोकसंख्या वाढीच्या अलेखात घट होण्यास सुरुवात होईल असाही अंदाज आहे.2011 ते 2027 या 16 वर्षात भारत आणि महाराष्ट्रासाठी लोकसंख्याशास्त्रीय सामाजिक-आर्थिक अंदाजांचा आढावा विविध स्रोतांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.जो वयोगट आणि प्रमुख निर्देशकांद्वारे अंदाजे वर्तवला आहे.

लोसंख्येचा कोरोना इफेक्ट

  • कोरोनाचा लोकसंख्या वाढीवर किंचित परिणाम 2020 ते 2021 या एका वर्षात दिसतो. 2022 नंतर एकूण लोकसंख्या वाढीच्या दरात मोठा फरक झालेला नाही.

  • 2020 मध्ये सरकारी नोंदीनुसार सुमारे 81 हजार मृत्यू.

  • 2021 या वर्षी मात्र 2020 पेक्षा 2 लाख 16 हजार जास्त मृत्यू

  • सरकारी आकडेवारीनुसार देशभरात कोविडच्या दोन तीव्र लाटेत सुमारे 2 लाख 96 हजार लोकांचा मृत्यू झाला मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यानुसार हा आकडा 3 लाख 40 हजार इतका असू शकतो.

  • 2022: मृत्यू कमी झाले. 15% घट

  • काही अभ्यासकांच्या मते कोरोनमुळे मृत्यूदर

  • वाढला मात्र ही बाब नव्या जनगणनेच्या आकडेवारी आणि अभ्यासानंतरच स्पष्ट होईल असाही एक मतप्रवाह आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT