पुणे

Pune Crime News : महिलेवर बलात्कार; फोटो व्हायरल करण्याची धमकी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भाच्याचा वाढदिवस असल्याचे सांगून मित्राने 29 वर्षीय महिलेला कोंढव्यातील एका हॉटेलमध्ये बोलवले. तेथे जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध करून तिचे निर्वस्त्र फोटो दुसर्‍या मित्राला पाठवले. तसेच याबाबत कुठे वाच्यता केली, तर फोटो व्हायरल करण्याची तसेच महिलेच्या पतीस ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कलीम सलीम शेख (45) आणि आश्रफ शेख (25) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय फिर्यादीला 17 ऑगस्ट 2010 रोजी तिचा मित्र कलीम याने फोन करत त्याच्या भाच्याचा वाढदिवस असल्याचे सांगितले. त्यानुसार ती कलीमने सांगितलेल्या येवलेवाडी, कोंढवा येथील एका हॉटेलमध्ये गेली. तेथे कलीमने बळजबरीने पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच याप्रकरणी कोणाला काही सांगितले तर वस्तीत बदनामी करण्याची धमकी देत, पीडितेच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पीडितेला मारहाण करत तिचे निर्वस्त्र फोटोंचे स्क्रिनशॉट आश्रफ शेख याला दाखवले व फोटो व्हायरल करण्याची धमकीदेखील दिली. हा प्रकार 2010 ते 14 ऑगस्ट 2023 दरम्यान घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT