भोसरी : भोसरीतील पुणे-नाशिक रस्त्यावर चेंबरचे झाकण तुटलेल्या स्थितीत आहे. सतत वर्दळीचा रस्ता असल्याने हे चेंबर धोकेदायक ठरत आहे. चेंबरच्या दुरवस्थेमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. दुचाकी चालक आणि पादचार्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने चेंबरच्या झाकणची दुरुस्त करावी, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांतून होत आहे .शहरात रस्त्यावरील उघड्या चेंबरमध्ये पडून अनेक दुर्घटना घडूनही महापालिका यातून बोध घेत नाही.
पुणे- नाशिक महामार्गासमोरील मारुती सुझुकी शोरूमजवळील रस्त्यावर धोकेदायक चेंबर आहे. महामार्ग असल्याने चारचाकी, दुचाकी, मोठ्या अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. परिणामी चेंबर चुकविण्याचा नादात अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा