पुणे

Weather Update! राज्यात पावसाचा मुक्काम; ‘या’ भागांत गारपिटीची शक्यता

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भात अवकाळी पाऊस अजून दोन दिवस राहणार आहे. दरम्यान, विदर्भातील काही भागांत गारपीट होईल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दुसरीकडे, बुधवारी राज्यात उन्हाचा तडाखा सुरूच होता. ब्रह्मपुरीत 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला वळीव पाऊस अजून दोन दिवस कायम राहणार आहे.

विशेषत:, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, तर विदर्भात गारपीट होण्याची शक्यता अधिक आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कर्नाटकपासून ते विदर्भापर्यंत द्रोणीय स्थिती तसेच पूर्व विदर्भ परिसरात वार्‍याची चक्रीय स्थिती कायम आहे. त्यामुळे राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे, तर विदर्भात गारपीट होत आहे.

मान्सून लवकरच अंदमानाच्या बेटांवर

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून लवकरच अंदमान, निकोबार बेटांवर पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, 19 मेपूर्वीच मान्सून दाखल होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे अंदमान, निकोबार बेटांसह आसपासच्या भागांत मुसळधार पाऊस पडत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT