पुणे : मागील काही दिवसांपासून पुणेकर कडाक्याच्या थंडीने कुडकुडत असतानाच शनिवारी मात्र किमान तापमानात किंचित वाढ झाली. परंतु रात्री ते पहाटेच्या थंडीत मात्र घट झालेली नाही.
अहिल्यानगर ७.३, पुण्याचे तापमान १०.१ अंशावर होते. विदर्भ वगळता उर्वरित भागातील किमान तापमानात शनिवारी किंचित वाढ झाली. त्यामुळे सायंकाळी काही भागातील गारठा किंचित कमी झालेला जाणवत होता.
अहिल्यानगर ७.३, पुणे १०.१, जळगाव ११.५, कोल्हापूर १५.४, महाबळेश्वर १२.५, मालेगाव १०.२, नाशिक १०, सांगली १४.१, सातारा ११.५, सोलापूर १५.२, छ. संभाजीनगर ११.५, परभणी १२.४, अकोला १२.४, अमरावती ११.१, बुलढाणा १३.४, ब्रह्मपुरी १२.२, चंद्रपूर १२.५, गोंदिया ९.२, नागपूर १०, वाशीम ११.२, वर्धा ११.५, यवतमाळ ११.६.