

पुणे : शनिवारपासून पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील किमान तापमानात किंचित वाढ झाल्यामुळे बोचरी थंडी कमी होण्याची शक्यता आहे. संपूर्ण जिल्ह्यातील किमान तापमानात शनिवारी १ ते २ अंशांनी वाढ दिसून आली.
गेल्या पंधरा दिवसांत प्रथमच शहराचे किमान तापमान ९.५ वरून १०.१ अंशांवर गेले. त्यामुळे शनिवारी सायंकाळपासून थंडी किंचित कमी जाणवण्यास सुरुवात झाली होती. किमान तापमानात आगामी तीन ते चार दिवसांत घट होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
लोणी काळभोर ८.९, माळीण ९.३, पाषाण ९.५, बारामती १०.१, शिवाजीनगर १०.१, तळेगाव १०.२, दौंड १०.७, आंबेगाव ११.१, कुरवंडे ११.५, निमगिरी ११.६, भोर १२.६, हडपसर १२.८, गिरिवन १४.१, कोरेगाव पार्क १४.३, चिंचवड १४.९, मगरपट्टा १५.६, वडगाव शेरी १५.८, लवळे १६.८