Weather Update Today Latest News
पुणे: यंदाच्या उन्हाळी हंगामातील सर्वात मोठी ठरलेली उष्णतेची लाट अखेर 26 दिवसांनी कमी झाली. रविवारी (दि. 27 एप्रिल) 4 ते 5 अंशांनी पारा खाली आला. त्यामुळे रविवारी किंचित हायसे वाटणारे वातावरण तयार झाले होते. दरम्यान, राज्यातील बहुतांश भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे.
अरबी समुद्रातून दमट वारे राज्यात दाखल झाल्याने ढगाळ वातावरण आणि बाष्पयुक्त वारे वाहू लागल्याने राज्यातील उष्णतेची तीव्र लाट एकदम कमी झाली असून विदर्भाचा पारा 45 अंशांवरून 39 ते 40 अंशांवर तर उर्वरित भागाचा पारा 37 ते 38 अंशांपर्यंत खाली आला आहे. सोमवार ते बुधवार राज्यातील बहुतांश भागात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सर्वाधिक तापमान पुण्यातील लोहगावात...
राज्यातील बुहतांश तापलेली शहरे रविवारी अचानक थंड झाली. पारा 44 ते 45 अंशांवरून 38 ते 40 अंशांपर्यंत खाली आला. त्यामुळे पुणे शहराच्या लोहगावमधील 42.8 अंश सेल्सिअस हे तापमान रविवारी राज्यात सर्वोच्च ठरले. उर्वरित राज्याचे तापमान त्याखाली गेले आहे.
रविवारचे राज्याचे तापमान...
पुणे (लोहगाव) 42.8, शिवाजीनगर 40.6, अहिल्यानगर 40.8, जळगाव 42.3, कोल्हापूर 37.1, महाबळेश्वर 33.6, मालेगाव 42.4, नाशिक 39.8, सांगली 38.4, सातारा 38.4, सोलापूर 40, धाराशिव 41.8, छत्रपती संभाजीनगर 41.7, परभणी 42.4, बीड 41.9, अकोला 42.4, अमरावती 41.2, बुलडाणा 40.2, ब्रह्मपुरी 41, चंद्रपूर 38.2, गोंदिया 37.4, नागपूर 39.2, वाशिम 42.4, वर्धा 39.9, यवतमाळ 38.8.