पुणे

Weather update : राज्यात शनिवारपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील बहुतांश भागांत बुधवारी (दि. 8) हलक्या पावसाने हजेरी लावली. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने येत्या शनिवारपर्यंत (दि. 11) कोकण व मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वार्‍याचा वेग वाढला आहे. त्यामुळे केरळ व कर्नाटक राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे.

मुंबई, पुणे शहरासह राज्यातील अकरा जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा अजून सक्रिय राहणार असल्याने 11 नोव्हेंबरपर्यंत कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील काही भागांत बुधवारी पाऊस झाला. मात्र, मराठवाडा व विदर्भातील पाऊस थांबणार आहे. 12 नोव्हेंबरपासून राज्यात कोरडे वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT