पुणे : पुढारी वृत्तसेवा : बंगालच्या उपसागरात रविवारपासून तयार होणार्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शहरात हलका पाऊस ढगांची गर्दी अन् दाट धुके राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरात मिचांग नावाचे चक्रीवादळ तयार होत असल्याने शहरावरही रविवारपासून मंगळवारपर्यंत बाष्पयुक्त ढगांची गर्दी, हलका पाऊस अन् धुक्याची चादर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दृष्यमानता कमी राहणार आहे.
शहरात 1 ऑक्टोबरपासून 1 डिसेंबरपर्यंत अवकाळी पावसाने अधून-मधून हजेरी लावली आहे. सतत येणार्या चक्रीवादळांमुळे शहरात दोन महिन्यांत 51 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक अवकाळी पाऊस दिवाळीत म्हणजे 10 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या दिवशी झाला होता.
हेही वाचा