पुणे

घराबाहेर पडताना रेनकोट घ्यायचा की स्वेटर?

backup backup

भोसरी : पुढारी वृत्तसेवा

भोसरीकरांना प्रश्न, श्रावणाची अनुभूती

डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी शहरासह भोसरी परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. गुरुवारी किमान तापमान घसरल्याने वातावरणात गारठा प्रचंड वाढ झाली.

त्यामुळे चाकरमानी, शालेय विद्यार्थी व नागरिकांनी घराबाहेर पडताना स्वेटर किंवा रेनकोट घेऊनच बाहेर पडत असल्याचे चित्र भोसरी परिसरात दिसत होते.

दिवसभर ढगाळ वातावरण आणि संततधार रिपरिपमुळे भोसरी परिसरात जागोजागी पाण्याचे तळे साचले होते. दिवसभर तापमान खाली आल्याने अचानक गारठा वाढला होता. शहरात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण हाते.

डिसेंबर महिन्याची सुरुवात अवकाळीच्या सरींनी झाली आहे. तापमान घसरण्याची शक्यता असल्याने थंडीतही वाढ झाली आहे.

त्यामुळे थंडीचा महिन्यात बाहेर निघणारे उबदार कपडे थंडी सुरू होण्याआधीच बाहेर निघाले असल्याचे चित्र भोसरी परिसरात पाहायला मिळाले.

थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटविण्यात आल्या होत्या. गुरुवारी मात्र प्रचंड गारवा असल्याने नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरली होती.

बहुतांशी नागरिक दिवसभर घरीच उबदार कपडे परिधान करून थांबले होते. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसत होता.

पावसाने नाही तर पावसातील गारव्याने भोसरीकरांना गारठले. त्यामुळे स्वेटर की रेनकोट घेऊन घराबाहेर पडायचा असा प्रश्न भोसरीकरांना पडला आहे.

अवकाळी पावसामुळे हवामानात बदल झाल्यामुळे साथीचे आजार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

SCROLL FOR NEXT