'छावा' चित्रपट टॅक्स- फ्री करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Source- x)
पुणे

'Chhaava' चित्रपट टॅक्स फ्री होणार का? मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

२०१७ मध्येच महाराष्ट्रात मनोरंजन कर हटवला

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना यांची भूमिका असलेल्या 'छावा' (Chhaava) चित्रपटाला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट टॅक्स- फ्री करण्याची मागणी केली जात आहे. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यात बोलत असताना फडणवीस म्हणाले, "छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर एक अतिशय चांगला चित्रपट बनवण्यात आला आहे, याचा मला आनंद आहे. मी अजून हा चित्रपट पाहिलेला नाही. पण लोकांकडून असे ऐकले आहे की हा चित्रपट इतिहासाचा विपर्यास न करता बनवण्यात आलाय. लोकांकडून हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याबाबत मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. मी लोकांना सांगू इच्छितो की आम्ही २०१७ मध्येच महाराष्ट्रात मनोरंजन कर हटवला आहे. हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांना पाहाता यावा यासाठी आम्हाला जे काही शक्य आहे ते आम्ही करू." असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

'छावा' २०० कोटींच्या क्लबजवळ

विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा सुपरहिट चित्रपट छावा लवकरच २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल. आज १९ फेब्रुवारी २०२५ रोजी शिवजयंती दिनानिमित्त सुट्टी लागल्याने छावाच्या कलेक्शनमध्ये आणखी भर पडेल, असा अंदाज चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी वर्तवला आहे. हा चित्रपट आज सहाव्या दिवशी २०० कोटींचा आकडा पार करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

बॉक्स ऑफिसवर 'छावा'ने पहिल्या आठ‍वड्यात शुक्रवारी ३३.१० कोटी, शनिवार ३९.३० कोटी, रविवारी ४९.०३ कोटी, सोमवारी २४.१० कोटी, मंगळवार २५.७५ कोटी अशी एकूण १७१.२८ कोटींची कमाई केलीय. या चित्रपटात विक्की कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची तर अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT