शहरातील अनेक भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन File Photo
पुणे

Pune Water Supply News: शहरातील अनेक भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन

वितरण व्यवस्थेतील त्रुटी होणार दुरुस्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पाणी वितरणातील त्रुटी दूर करण्यासाठी व जलवाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पुण्याच्या विविध भागात गुरुवारी (दि. 12) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर दुसर्‍या दिवशी शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

वारजे जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत बालेवाडी जकात नाका टाकी, सन हॉरिझोन टाकी, बाणेर वेस्ट टाकी, पाषाण लेक टाकी, लोकसेवा सूस-पाषाण-बाणेर लिंक रोड टाकी, पॅनकार्ड क्लब रोड टाकी येथे मुख्य पाण्याच्या लाइनला नव्याने टाकण्यात आलेल्या लाइन जोडणे व व्हॉल्व बसविणे हे काम करण्यात येणार आहे. (Latest Pune News)

तसेच भामा-आसखेड अंतर्गत येणार्‍या भागामध्ये पाणी वितरणामधील त्रुटी दूर करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर, शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

वारजे जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत असणार्‍या पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी, चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्करखिंडीकडील परिसर, शास्त्रीनगर, व्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, बाणेर, बालेवाडी, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाण तांडा, मोहन नगर, सुस रोड, धनकुडे वस्ती, पंचवटी, म्हाळुंगे, सुस येथे पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

तर वारजे जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीतील पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसरातील बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब रोड, शिंदे-पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडीपॉईंट रोड, आंबेडकर नगर, दत्तनगर या भागात पाणी बंद ठेवले जाणार आहे. भामा आसखेड प्रकल्पाअंतर्गत येणार्‍या धानोरी, वडगाव शेरी, खराडी, विमाननगर, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, येरवडा, संजय पार्क, लोहगाव, शेजवळ पार्क खराडी या भागातही पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT