पुणे

भोर शहरात टँकरने पाणीपुरवठा

अमृता चौगुले

भोर : पुढारी वृत्तसेवा :  अनियमित वीजपुरवठा होत असल्यामुळे वेळोवेळी भोर शहरात पाणीपुरवठा करणारे भाटघर येथील पंपहाऊस बंद राहत आहे. परिणामी, भोर शहरात चौपाटी परिसरात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला असल्याचे शुभम शेटे यांनी सांगितले. भाटघर पंपहाऊस येथील वीजपुरवठा अद्यापही बंद असल्यामुळे पंपहाऊस येथील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे.

परिणामी, भोर शहरातील पाणीपुरवठा बंद राहिला. याची दखल घेत आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शना खाली शेटेवाडी, चौपाटी, वेताळपेठ, लक्ष्मीनगर (झोपडपट्टी) या भागात शुभम शेटे यांनी स्व:खर्चाने 40 हजार लिटर पिण्यायोग्य पाणी टँकरने वाटप केले. जर सकाळी पंपहाऊस येथील वीजपुरवठा सुरू न झाल्यास संपूर्ण भोर शहरातील भागात टँकरने पाणीपुरवठा केला जाईल, असे शेटे यांनी सांगितले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT