खडकवासला: पावसाअभावी धरणसाठ्यात घट सुरूच असून आज सोमवारी (दि.11) सकाळपासून पावसाळी वातावरण असूनही पाऊस पडला नाही, सायंकाळी पानशेत, वरसगाव परिसरात तुरळक पाऊस पडला.
सोमवारी सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 25.74 टीएमसी म्हणजे 88.29 टक्के साठा होता. जोरदार पाऊस पडणार्या रायगड जिल्ह्यातील हद्दीवरील घाटमाथ्यासह पानशेत -वरसगावसह टेमघर परिसरात तुरळक अपवाद वगळता पावसाची उघडीप आहे. गेल्या चार दिवसांपासून धरणसाखळीत घट सुरू आहे. (Latest Pune News)
मोठ्या प्रमाणात घट झाली नाही. गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत आज धरणसाठ्यात अल्प प्रमाणात केवळ 0.02 टीएमसीची घट झाली. वरसगाव व पानशेतमधून पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे, त्यामुळे या दोन्ही धरणाच्या पाणीपातळीत मंद गतीने वाढ सुरू आहे.
तर टेमघरची पातळी चार दिवसांपासून 94.17 टक्क्यावर स्थिर आहे. पिण्यासह शेतीला पाणी सोडले जात असल्याने खडकवासला धरणाची पातळी 52 टक्क्यांवर खाली गेली आहे. सोमवारी टेमघर येथे फक्त 1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. इतर तिन्ही धरणक्षेत्रात पावसाची नोंद झाली नाही.
खडकवासला धरणसाखळी
एकूण पाणी साठवणक्षमता 29.15 टीएमसी