पुणे

खडकवासला धरणावर जलरक्षण अभियान..

Laxman Dhenge

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : सोमवारी धूलिवंदनाच्या दिवशी खडकवासला धरणातील पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी जलरक्षण अभियान राबविण्यात येत असताना दुसरीकडे पानशेत रस्त्यावरील धरण परिसरातील हॉटेल आणि ढाब्यांवर तरुणांईची हुल्लडबाजी सुरू होती.
खडकवासला धरण माथ्यापासून डीआयडीपर्यंत खडकवासला धरणतीरावर हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसह हवेली पोलिस, खडकवासला जलसंपदा विभागाचे सुरक्षारक्षक, कर्मचारी सकाळपासून पाहरा देत उभे होते. त्यामुळे चौपाटीसह परिसरात शुकशुकाट होता.

दुसरीकडे धरणतीरावरील गोर्‍हे बुद्रुक (ता. हवेली) येथील एका रिसॉर्टमध्ये धूलिवंदनाच्या कार्यक्रमात शेकडो तरुणाई बेधुंद होऊन रंग उधळताना दिसून आली. पुणे-पानशेत रस्त्यावरील विविध हॉटेल, ढाब्यांवरही असेच चित्र होते. दुचाकी, चारचाकी वाहनांच्या हॉटेलसमोरील मुख्य रस्त्यावर रांगा लागल्या होत्या. एकमेकांवर रंग उधळत तरुणाईने धुळवडीचा जल्लोष साजरा केला. हवेली पोलिसांनी खडकवासला धरण चौकापासून रस्त्यावर ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे धरण परिसरात
शुकशुकाट होता.

धरण चौकात नाकाबंदी करून परिसरात पोलिस तैनात केले होते. त्यामुळे धरणात कोणीही उतरले नाही. हॉटेलमध्ये खासगी कार्यक्रम होते. कोठेही धरणात उतरून पाण्याचे प्रदूषण करण्याचा प्रकार घडला नाही.

– सचिन वांगडे, पोलिस निरीक्षक, हवेली पोलिस ठाणे

हेही वाचा

SCROLL FOR NEXT