पुणे

पिंपरी-चिंचवडची पाण्याची चिंता मिटली ; पवना धरण नव्वदी पार

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणारे मावळ तालुक्यातील पवना धरणात 91 टक्केपेक्षा अधिक पाणी साठा झाला आहे. बुधवारी (दि.2) पाणीसाठ्याने नव्वदी पार केली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरासह औद्योगिक पट्ट्यातील वर्षभराची पाणी समस्या दूर झाली आहे. धरणात जून महिन्यात केवळ 16 टक्के साठा शिल्लक होता. पवन धरण क्षेत्रात जून महिन्याच्या अखेरीपासून पावसाने हजेरी लावल्याने पाणी साठ्यात हळूहळू वाढ होत गेली. धरण 20 जुलैला निम्मे भरले. तर, जुलैअखेरपर्यंत साठा वाढून तो 75 टक्केपर्यंत पोहचला. धरणात बुधवारी (दि.2) सकाळी सहापर्यंत 89.82 टक्के इतका साठा झाला. तर, सायंकाळी पाचपर्यंत 90.66 टक्क्यांपर्यंत साठा पोहचला. धरणात 7.71 टीएमसी इतका उपयुक्त पाणी साठा आहे. आज दिवसभरात केवळ 1 मिलिमीटर पाऊस झाला आहे. आतापर्यंत एकूण 1863 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, धरण परिसरात पाऊस कायम असल्याने साठ्यात सातत्याने वाढ होत आहे. असाच पाऊस कायम राहिल्यास येत्या आठवड्याभरात हे धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. धरणात मोठ्या प्रमाणात साठा झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने पवना नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

धरणातील पाणीसाठा, टक्केवारी, एकूण पाऊस
पवना-7.71 टीएमसी-90.66 टक्के-1863 मिलिमीटर मुळशी-17.03 टीएमसी-84.50 टक्के-1791 मिलिमीटर
आंद्रा-2.59 टीएमसी-88.79 टक्के-628 मिलिमीटर भामा आसखेड-6.01 टीएमसी-78.40 टक्के-458 मिलिमीटर

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT