Pune Tanker Accident Pudhari
पुणे

Pune Tanker Accident: पुण्यातील रस्त्यांवर टँकरची दहशत; वानवडीत इंजिनिअर तरुणीचा मृत्यू, दोन दिवसांत अपघाताची दुसरी घटना

wanwadi pune todays news: मंगळवारी वानवडीत पाण्याच्या टँकरच्या चाकाखाली सापडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

पुढारी वृत्तसेवा

वानवडे, पुणे : भरधाव टँकरने मोपेड दुचाकीवर निघालेल्‍या इंजिनिअर तरुणीला दिलेल्‍या धडकेत तिचा मृत्‍यू झाल्‍याची घटना वानवडी परिसरातील गंगा सॅटेलाइटसमोर सकाळी पावणेआठच्‍या सुमारास घडली. ग्रेसिया डॅनिअल इसा (वय 22, रा. नॅन्सी टॉवर, केदारी पेट्रोल पंपासमोर, वानवडी) असे अपघाती मृत्‍यू झालेल्‍या तरुणीचे नाव आहे.

याप्रकरणी टँकरचालक संतोषकुमार इंद्रदेवप्रसाद मौर्या (वय 45, रा. नेताजीनगर, वानवडी; मूळ रा. रजौली, जि. नवादा, राज्‍य बिहार) असे अटक करण्यात आलेल्‍याचे नाव आहे. याबाबत मुलीची आई गीता डॅनिअल इसा (वय 49, रा. नॅन्सी टॉवर, केदारी पेट्रोल पंपासमोर, वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे.

ग्रेसिया ही इंजिनिअर असून, ती नांदेड सिटी येथे नोकरीला आहे. तिच्‍या कामाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी साडेसात आहे. मंगळवारी तिला ऑफिसमध्ये लवकर बोलावले असल्‍यामुळे दुचाकीवरून बाहेर पडली. सकाळी पावणेआठच्‍या सुमारास ती वानवडी येथील गंगा सॅटेलाइटसमोरील रोडवरून जात असताना भरधाव पाण्याच्‍या टँकरेचा दुचाकीला धक्‍का लागला आणि ती खाली पडली.

काही क्षणातच तिच्‍या डोक्‍यावरून टँकरचे चाक गेले. तिला तत्‍काळ ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारांपूर्वीच तिचा मृत्‍यू झाल्‍याचे घोषित करण्यात आले. याप्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे. वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सारिका शिर्के तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT