Pune Women Enede Life Pudhari
पुणे

Pune Women Enede Life: सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; मारतीच्या पाचव्या मजल्यावरून मारली उडी

वानवडीतील घटना

पुढारी वृत्तसेवा

पुणे: माहेरहून पैसे आणि सोन्याचे दागिने आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ होत असल्याने विवाहितेने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना वानवडी परिसरातील ग्रँड स्केअर सोसायटी येथे घडली. याप्रकरणी पतीसह सासूवर गुन्हा दाखल केला आहे.

लक्ष्मी मारुती मिरेकर (वय ३३) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत लक्ष्मी यांचे भाऊ विठ्ठल अंबादास शिंदे (वय ३१, रा. भोसरी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती मारुती सावळा मिरेकर (वय ३६) आणि सासू नागू सावळा मिरेकर (वय ६०) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १० जून रोजी सायंकाळी ५ ते ६ दरम्यान ग्रँड स्केअर सोसायटी, हडपसर येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत लक्ष्मी आणि मारुती यांचा २००८ मध्ये विवाह झाला असून, त्यांना दोन मुले आहेत. लक्ष्मी या धुणी- भांडी करण्याचे काम करत होत्या, तर मारुती हा कोणताही कामधंदा करत नव्हता. त्यामुळे तो नेहमी माहेरहून पैसे आणण्यासाठी त्यांना त्रास देत होता.

तसेच धोड्यांच्या महिन्यात भावाकडून एक तोळ्याची सोन्याची अंगठी आणण्याची मागणी करत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून लक्ष्मी यांनी सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. त्या बाजूच्या इमारतीच्या छतावर पडून गंभीर जखमी झाल्या. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा पुढील तपास वानवडी पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT