Birth Certificate Delay: जन्म दाखल्यांसाठी नागरिकांची वणवण; शाळाप्रवेश ठप्प

पालक त्रस्त; प्रशासन सुस्त
birth certificate
birth certificatePudhari
Published on
Updated on

खडकवासला: नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी जन्माचे दाखले तसेच वारस नोंदीसाठी मृत्यूचे दाखले मिळत नसल्याने नागरिकांची सिंहगड रोड व इतर क्षेत्रीय कार्यालयापासून पालिका मुख्यालयापर्यंत वणवण सुरू आहे. दाखले मिळत नसल्याने पालक, नागरिक त्रस्त झाले आहेत, तर दुसरीकडे महापालिका प्रशासन सुस्तावले आहे.

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात गेल्या अनेक दिवसांपासून जन्म-मृत्यूचे दाखले देण्यास टाळाटाळ केली जात आहे. दाखले न मिळण्याची नेमकी कारणेही सांगितली जात नाहीत. त्यामुळे नागरिक थेट पालिका मुख्यालयात धाव घेत आहेत. तेथेही नागरिकांची दखल घेतली जात नाही, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.

birth certificate
Millisecond Pulsar Discovery: आपल्या आकाशगंगेत सापडले पाच नवीन न्यूट्रॉन तारे; 'एनसीईआरए'च्या शास्त्रज्ञांचे संशोधन

जन्म-मृत्यू दाखल्यांच्या चूक दुरुस्ती करण्यासाठी मिळणारे फॉर्मसुद्धा कार्यालयात उपलब्ध नाहीत. फोटो काढून घ्या आणि झेरॉक्स काढून आणा, असे सांगितले जात आहे. कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या अरेरावीमुळे नागरिक वैतागले आहेत. आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर यांनी या समस्येकडे पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.

धनंजय बेनकर म्हणाले, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जन्म-मृत्यूच्या बोगस नोंदी रद्द करण्याची मागणी केली होती. तेव्हापासून जन्म-मृत्यूचे दाखले तसेच या दाखल्यांमधील चूक दुरुस्ती करण्याची कार्यवाही ठप्प झाली आहे. दाखले न देण्याचे नेमके कारणही अधिकारी सांगत नाहीत.

birth certificate
Fake Foreign Liquor Seized: एक्साईजने पकडला एक कोटी ३५ लाखांचा बनावट विदेशी मद्यसाठा; पाषाण भागात कारवाई

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी जन्माचे दाखले आवश्यक आहेत. यावेळी येत्या आठवडाभरात जन्म-मृत्यू दाखल्यांची चूक दुरुस्ती करून दाखले देणे तसेच जन्म- मृत्यूचे नियमानुसार दाखले न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पक्ष तसेच नागरिकांनी दिला आहे.

जन्म-मृत्यूचे दाखले देण्याची सुलभ प्रकिया होती. मात्र, अलीकडच्या काळात चूक दुरुस्ती करून दाखले देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना वणवण करावी लागत आहे. एजंटांना मात्र दाखले मिळत आहेत, त्यांच्याकडून नागरिकांची आर्थिक लूट सुरू आहे.

- गणेश शेडगे, रहिवासी

जन्म-मृत्यूचे दाखले आरोग्य विभागाकडून दिले जातात. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन तातडीने पूर्वीप्रमाणे जन्म-मृत्यूचे दाखले देण्याच्‍या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.

- विजय वाघमोडे, सहायक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news