Pune Highway Rubble Removal Pudhari
पुणे

Pune Highway Rubble Removal: वडगाव बुद्रुकमध्ये महामार्गावरील राडारोडा हटवला; वाहतूक सुरळीत

महापालिकेने दखल घेत दोन महिन्यांपासून पडलेला राडारोडा हटवल्याने मुंबई-बंगळुरू महामार्गावरील कोंडी दूर झाली

पुढारी वृत्तसेवा

धायरी: मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वडगाव बुद्रुक परिसरात राडारोडा, माती आणि मुरुमाचे ढीग गेल्या दोन महिन्यांपासून पडून असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. याबाबत दै. ‘पुढारी’ने नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने या मार्गावरील राडारोडा उचलल्याने वाहतुकीतील अडथळा दूर झाला आहे.

मुंबई महामार्गावर वडगाव बुद्रुक येथे माजी नगरसेवक विकास दांगट यांच्या ऑफिससमोर रस्तारुंदीकरणात येणारी मोठी झाडे तोडून मोठे खोदकाम करण्यात आले होते. या खोदकामाचा राडारोडा व मातीचे ढीग गेल्या दोन महिन्यांपासून महामार्गालगत पडून होते. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होऊन कोंडी देखील होत होती.

यामुळे वाहनचालक, प्रवासी आणि नागरिकांची गैरसोय होत होती. दांगट यशगंगा ऑफिस ते स्वर्णा हॉटेलपर्यंतच्या रस्त्यावरच हा राडारोडा अस्ताव्यस्त पडलेला होता. याबाबत दै.’पुढारी’ने ‘मुंबई महामार्गालगत दोन महिन्यांपासून राडारोडा’ या आशयाचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध केले होते. महापालिका प्रशासनाने या वृत्ताची दखल घेत महामार्गालगत पडलेला राडारोडा व मातीचे ढीग त्वरित उचलून संपूर्ण रस्ता मोकळा आणि सपाट केला आहे. यामुळे महामार्गावर वाहतुकीतील अडथळा दूर झाल्याने वाहनचालक आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT