Arrested Pudhari
पुणे

Pune Drug Case: यूएईतून ड्रग्ज तस्करीचा सूत्रधार भारतात; ३६०० कोटींच्या पुणे ड्रग्ज प्रकरणात वीरूला अटक

१,८३७ किलो मेफेड्रोन तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपी विरेंदर सिंह बसोया ऊर्फ वीरूला २१ ऑगस्टपर्यंत एनसीबी कोठडी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आंतरराष्ट्रीय स्तरावरील तब्बल १३ हजार कोटी रुपयांच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणातील वॉन्टेड तर पुण्यातील ३६०० कोटींच्‍या ड्रग प्रकरणात सूत्रधार असलेल्‍या विरेंदर सिंह बसोया ऊर्फ वीरू याला यूएईतून भारतात आणण्यात आले. प्रत्‍यार्पणानंतर त्‍याला अटक करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये उघडकीस आणलेल्या सुमारे १ हजार ८३७ किलो मेफेड्रोन तस्करी प्रकरणातील तो प्रमुख आरोपी आहे. रविवारी त्याला कडक सुरक्षा व्यवस्थेत पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला २१ ऑगस्टपर्यंत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) कोठडीत पाठविले.

पुणे पोलिसांनी २०२४ मध्ये मेफेड्रोन तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले होते. पुणे आणि दिल्लीमधून तब्बल १,८३७ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. त्यात पुण्यातून सुमारे ८६७ किलो जप्त केले होते.

मुख्य आरोपी धुनियाशी संबंध

बसोयाचा दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणलेल्या सुमारे १३ हजार कोटी रुपयांच्या कोकेन व अन्य अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणाशीही संबंध असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. संदीप धुनियाशी त्याचे निकटचे संबंध असल्याचेही तपासात समोर आले आहे.

कोण आहे आरोपी बसोया?

  • लंडनमधून तस्‍करीचा कट रचण्यातील सूत्रधार

  • बसोया हा संदीप धुनिया याच्या संपर्कात लंडनमधून मेफेड्रोन तस्करीचे जाळे चालवण्यात अग्रेसर

  • दिल्लीतून ९७० किलो मेफेड्रोन पाठविण्याची योजना

  • आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा परदेशातील प्रमुख सूत्रधार

  • जून २०२६ मध्ये त्याला यूएईमध्ये ताब्यात

  • 'ऑपरेशन ग्लोबल हंट' ंतर्गत १४ ऑगस्टला भारतात आणले

  • पुणे प्रकरणात आतापर्यंत १६ आरोपींना अटक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT