पुणे : महिलांच्या आयटीएफ टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या वैदेही चौधरी हिने विजेतेपद संपादन केले. या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये एकेरीत अंतिम फेरीत सहाव्या मानांकित अहमदाबादच्या वैदेही चौधरी हिने जपानच्या मिचिका ओझेकी चा 3-6, 6-3, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद पटकावले.
हा सामना 1 तास 53 मिनिटे चालला. स्पर्धेत या आधीच्या सामन्यात सलग तीन वेळा पहिला सेट गमावलेल्या वैदेही हिने तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये चौथ्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-4 असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी बर्झिन मास्टर, शर्लिन डिसूझा, सौरव गुप्ता, एम. राजकुमार यांसह मान्यवर उपस्थित होते. सन २०२५ मधे लॉन टेनिस क्रीडा स्पर्धेत उत्तम कामगिरी करून सोलापूरचा नावलौकिक केल्याबद्दल संध्याराणी बंडगर यांचा वैदेही चौधरी यांच्या हस्ते स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आहे.