UPSC Mains Exam 2025 Schedule
पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीमार्फत घेण्यात येणार्या विविध परीक्षांची तयारी करत असलेल्या स्पर्धा परीक्षार्थींसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा मुख्य परीक्षा, 2025 चे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे.
यूपीएससी मुख्य परीक्षा 2025 कधी आहे?
ही परीक्षा 22 ते 31 ऑगस्टदरम्यान घेण्यात येणार आहे. 2025 च्या मुख्य परीक्षेत बसणार्या सर्व यूपीएससी उमेदवारांसाठी हे एक महत्त्वाचे वेळापत्रक आहे. ही परीक्षा दररोज दोन सत्रांमध्ये घेतली जाईल.
परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
नागरी सेवा मुख्य परीक्षा 22, 23, 24, 30 आणि 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत दोन सत्रांत घेण्यात येणार आहे.
यूपीएससी मुख्य परीक्षेच्या वेळा काय आहेत?
पहिले सत्र सकाळी 9 ते 12 या वेळेत असेल, तर दुसरे सत्र दुपारी 2:30 ते 5:30 या वेळेत घेण्यात येईल. यूपीएससीने यंदा 979 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. पूर्वपरीक्षा दिलेल्या 10 लाखांहून अधिक उमेदवारांपैकी 14 हजार 161 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. ही संख्या उपलब्ध जागांच्या सुमारे 12-14 पट असल्याचे सांगण्यात आले आहे.
एकूण किती पदे भरणार?
या भरती प्रक्रियेअंतर्गत आयएएस 180 पदे, आयएफएस 55 पदे, आयपीएस 150 पदे, आयए आणि एएस 28 पदे आणि आयसीएस 15 पदे अशी एकूण 979 पदे भरण्यात येणार आहेत.
यूपीएससीच्या नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी वेळापत्रकात नऊ वर्णनात्मक पेपर्स आहेत. त्यापैकी दोन पात्रता स्वरूपाचे आहेत (इंग्रजी आणि एक भारतीय भाषा). उर्वरित सात पेपर्स, ज्यामध्ये चार सामान्य अध्ययन पेपर्स, एक निबंध आणि दोन पर्यायी पेपर्स समाविष्ट आहेत. गुणवत्तेसाठी ते मोजले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.