नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्याच्या उत्तर विभागात अवकाळी पावसाने भात पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी सध्या भात कापणीचे काम सुरू आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे भाताचे संपूर्ण पीक पावसामध्ये भिजले.
सांगनोरे, भोईर वाडी, पिंपळगाव जोगा, पश्चिम भाग, सिद्धेवाडी वाटखळ, मढ, मांडवे, कोपरे, कटेवाडी या भागातील संपूर्ण भारताची पिके पावसात भिजली. ऑक्टोबर महिन्यामध्ये पावसाने गुंगारा दिल्यावर शेतकर्यांनी भात पिकाला पाणी भरून जगवले. थोड्या फार प्रमाणात आलेले भाताचे पीक पावसाने हिरावून नेले, अशी खंत येथील शेतकरी भरत मोरे यांनी व्यक्त केली. आमच्या भात पिकाच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे केले जावेत, अशी मागणी देखील मोरे यांनी केली आहे.
हेही वाचा :