पुणे

दुर्दैवी ! पुण्याच्या एकाच कुटुंबातील तिघांचा अपघाती मृत्यू

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पणजीहून मुंबईकडे निघालेली भरधाव आराम बस नियंत्रण सुटल्याने पिरवाडीजवळ रस्त्यावर उलटून झालेल्या अपघातात पुणे येथील एकाच कुटुंबातील तिघे ठार, तर अन्य नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली असून, मृतांत आईसह दोन लेकरांचा समावेश आहे.

फिर्यादी विराट विठ्ठललाल गौतम (रा. मांजरी बु., ता. हवेली, जि. पुणे) हे गोवा येथून आराम बसने (एमएच 12 टीव्ही 1658) कुटुंबासह मुंबईकडे निघाले होते. कोल्हापूर-राधानगरी रोडवर बुधवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास पिरवाडी जवळच्या एका वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे आराम बस रस्त्यावर उलटली. या

अपघातात फिर्यादी यांची पत्नी सौ. नीलू विराट गौतम (वय 48), मुलगी कु. रिदिमा (17), कु. सार्थक (13) यांचा मृत्यू झाला. तसेच नऊ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातात आराम बसच्या एका बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. गौतम यांनी चालक निरंजनय्या बसय्या हिरेमठ (29, रा. लिंगापूर, जि. बागलकोट, कर्नाटक) याच्याविरोधात करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT