पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : कुरिअरच्या नावाखाली एका महिलेला 36 लाख 99 हजार 999 रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार बाणेर परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी एका महिलेने बुधवारी (दि. 9) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मोबाइल क्रमांक आणि स्काइप आयडी वापरकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या मोबाइल व स्काइप आयडीवरून फिर्यादी महिलेशी संपर्क केला. तुमच्या नावाने कुरिअर आले असून कस्टम विभागाने ते पकडले आहे. यामध्ये लॅपटॉप, गांजा व 140 ग्रॅम एमडीएमए आहे. मी तुम्हाला यातून बाहेर काढतो. मात्र, व्हेरिफिकेशनसाठी 36 लाख 99 हजार 999 रुपये भरा. व्हेरिफिकेशन झाल्यावर ते पैसे तुम्हाला परत मिळतील, असे खोटे सांगून फिर्यादी यांच्याकडून ऑनलाइन पैसे घेऊन ते परत न देता फसवणूक केली. पोलिस उपनिरीक्षक साळुंके याबाबत अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा