पुणे : पुढारी वृत्तसेवा : मित्र मंडळ चौकातील मित्र मंडळ सभागृहासमोर दोन मोठ्या स्कूल बस आणि एक टेम्पो ट्रॅव्हलर गाडी कित्येक दिवसांपासून पार्क केली आहे. त्यामुळे मित्र मंडळ चौकातून ई-लर्निंग स्कूलकडे जाणार्या मुख्य रस्त्यावर दररोज पिकअवरमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहचालकांना मनस्ताप होत असून, वाहनांना येथून जाण्यासाठी रस्ता अपुरा पडत आहे.
मित्र मंडळ चौकातील या मार्गावरून दिवसभर वाहनांची मोठी रहदारी असते. अगोदरच या मार्गावर विक्रेते आणि दुकानदारांची वाहने ठिकठिकाणी लागलेली असतात. त्यामुळे येथे प्रचंड कोंडी होते. त्यातच या दोन मोठ्या स्कूल बस आणि एक टेम्पो ट्रॅव्हलर गाडी अनधिकृतरीत्या पार्क होत असल्यामुळे प्रचंड कोंडी होत आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असून, तातडीने या गाड्या हटवाव्यात, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.
हे ही वाचा :