इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : पुणे- सोलापूर जिल्ह्यास वरदान ठरलेले उजनी धरण मंगळवारी (दि. १) मायनसमधून प्लसमध्ये आले. त्यामुळे उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांनाच काहीअंशी दिलासा मिळाला आहे. मात्र, उजनी धरण शंभर टक्के क्षमतेने भरण्यासाठी अद्यापही ५३ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.
१ आॅगस्टला उजनी धरणातील एकूण पाणीसाठा ६४.११ टीएमसी झाल्याने उजनी धरण प्लसमध्ये आले आहे. गतवर्षी याच दिवशी उजनीत जवळपास १०५ टीएमसी इतका पाणीसाठा होता. त्यामानाने आज उजनीत ४२ टीएमसी पाणीसाठा कमी आहे.
पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर मोठा पाऊस झाल्याने उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. मंगळवारी उजनी धरणातील पाणीसाठा हा प्लसमध्ये आला आहे. १८ जुलै ते १ आॅगस्ट या चौदा दिवसांत उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात १८. ५२ टीएमसीने वाढ झाली आहे. सध्या उजनी धरणात दौंड बंधाऱ्यातून उजनी जलाशयात ११०८० क्युसेकने पाणी येत आहे.
एकूण पाणीपातळी – ४९१.०९५ मीटर
*एकूण पाणीसाठा – १८१५ .६९ दलघमी
*एकूण पाणीसाठा – ६४ .११ टीएमसी
*उपयुक्त पाणीसाठा – १२. ८८ दलघमी
उपयुक्त पाणीसाठा – ०.४५ टीएमसी
*टक्केवारी – ०.९५ टक्के
*विसर्ग
दौंड – ११०८० क्युसेक
हेही वाचा :