आपत्ति व्यवस्थापन अतिरिक्त विषय म्हणून नेट अभ्यासक्रमात समाविष्ट  File Photo
पुणे

UGC-NET 2024 | ‘आपत्ती व्यवस्थापन’मध्येही नेट

पुढारी वृत्तसेवा

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (यूजीसी नेट) आता नव्या विषयाची भर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार डिसेंबरमध्ये होणार्‍या परीक्षेत विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन विषयात नेट परीक्षा देता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यूजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

आणखी एका विषयाची भर

सहायक प्राध्यापकपदासाठी, संशोधन पाठ्यवृत्तीसाठी यूजीसी नेट परीक्षा वर्षातून जून आणि डिसेंबर अशी दोनवेळा घेतली जाते. यंदापासून पीएच. डी.च्या प्रवेशासाठीही याच परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय यूजीसीने घेतला आहे. यूजीसी नेट परीक्षेत सध्या 83 विषय उपलब्ध आहेत. त्यात आता आपत्ती व्यवस्थापन विषयाचा समावेश करण्यात येणार आहे.

अतिरिक्त विषय म्हणून समाविष्ट

तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशींनुसार, यूजीसी नेटसाठी उपलब्ध असलेल्या विषयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन हा अतिरिक्त विषय म्हणून यूजीसी नेटमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय आयोगाच्या 580 व्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता डिसेंबरमध्ये होणार्‍या परीक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापन हा विषय उपलब्ध असणार आहे. या विषयासाठीचा अभ्यासक्रम https:/// www.ugcnetonline.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT