UGC-NET 2024 | नेट परीक्षा आता ऑनलाइनच

एनटीएकडून नेट परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर
NTA has announced new exam dates for June 2024 session
NTA ने 2024 जून सत्रासाठी परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत.File Photo
Published on
Updated on

पुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएने विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी नेट) 2024 जून सत्रासाठी परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षेसाठी एनटीएने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या 21 ऑगस्टपासून होणारी ही परीक्षा आधी ठरल्याप्रमाणे ऑफलाइन न होता आता ऑनलाइन स्वरूपात घेतली जाणार आहे.

प्रश्नपत्रिका फुटल्याने सर्व विस्कटले

एनटीएने यंदा पहिल्यांदाच नेट परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार देशात 18 जून रोजी झालेली नेट परीक्षा ऑफलाइन घेण्यात आली होती. परंतु, परीक्षा झाल्यानंतर त्याच दिवशी प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती उघडकीस आली. त्यामुळे एनटीएने संबंधित परीक्षा तत्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला तसेच परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्याचे स्पष्ट केले होते.

NTA has announced new exam dates for June 2024 session
UGC-NET 2024 | ‘यूजीसी-नेट लीक प्रश्नपत्रिका डार्कनेट, टेलिग्रामवर सापडली’

सुधारित वेळापत्रकानुसार, आता यूजीसी नेट जून 2024 परीक्षा 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2024 या कालावधीत देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. याव्यतिरिक्त वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संयुक्त परिषद-विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षा 25 ते 27 जुलैदरम्यान घेण्यात येणार आहे.

एनटीएने जाहीर केल्यानुसार आता दोन्ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपातच घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या दोन्ही परीक्षा भारतीय विद्यापीठे आणि संशोधन संस्थांमध्ये लेक्चरशिप आणि रिसर्च फेलोशिप मिळविणार्‍या उमेदवारांसाठी घेतल्या जातात. तसेच यंदापासून नेट परीक्षेच्या आधारे पीएच. डी.ला देखील प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे संबंधित परीक्षांना विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news