पुणे

पुणे : रेल्वेच्या दोन डेमू गाड्या पूर्ववत

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

रेल्वेने 13 मे पासून 29 मे पर्यंत नुकत्याच 25 गाड्या 17 दिवसांसाठी रद्द केल्या होत्या. मात्र, येत्या काही दिवसात आषाढी एकादशी असल्यामुळे भाविकांचे प्रचंड हाल होणार आहेत, हे लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने निजामाबाद- पंढरपुर – निजामाबाद डेमू आणि निजामाबाद -पुणे_ दौंड- निजामाबाद डेमू या दोन गाड्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.

दौंड स्थानकादरम्यान रेल्वेच्या सबवेचे काम हाती घेण्यात आले आहे, त्यामुळे या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. आता २ डेमू पूर्ववत सुरू झाल्याने आषाढी यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांना आणि रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. परंतु या दोन गाड्या दौंड स्थानकावरून सुटण्याऐवजी दौंड कॉर्ड लाईन येथून सुटतील, असेही रेल्वे प्रशासनाने सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT