Tukaram Mundhe Pudhari
पुणे

Milk Adulteration Maharashtra: भेसळखोरांना पूर्णपणे अटकाव केल्याशिवाय तपासण्यांची मोहिम थांबणार नाही; तुकाराम मुंढे यांचा इशारा

शेतकऱ्यांच्या दुधाला वाजवी दर, ग्राहकांना उत्तम गुणप्रतिचे दूध मिळायला हवे

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्रातील दूध भेसळयुक्त असल्याच्या चर्चेला मला पूर्णविराम दयायचा असून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गाई-म्हशीच्या दुधाला वाजवी दर आणि ग्राहकांना निर्भेळ व उत्तम गुणप्रतिचे चांगले दूध मिळायला हवे. त्यादृष्टिने अन्न पदार्थांमधील भेसळीचे उच्चांटन करण्यासाठी मी तपासण्यांची मोहिम हाती घेतली आहे.

तपासण्या करण्यात, धाडी टाकण्यात अथवा कोणावरही कारवाई करण्यात आम्हाला रस नाही. पंरतु चुकीचे वागणाऱ्यांची गय केली जाणार नाही आणि ज्यामध्ये भेसळखोरांना पूर्णपणे अटकाव केल्याशिवाय तपासण्यांची मोहिम थांबणार नसल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या शिष्टमंडळाने अन्न व औषध प्रशासनाच्या वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील कार्यालयात मुंढे यांची भेट घेतली. बुधवारी (दि.3) त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार असोसिएशनचे ज्येष्ठ संचालक श्रीपाद चितळे, आबासाहेब थोरात आणि कल्याणकारी संघाचे मानद सचिव प्रकाश कुतवळ यांनी केला. त्यानंतर झालेल्या चर्चेत त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आगामी काळात राबवायच्या विविध विषयांवर सखोल चर्चा केली.

दूध भेसळ आणि भेसळीच्या पनीरला अटकाव घालण्यासाठी कल्याणकारी संघाने शासनाच्या दुग्ध व्यवसाय विकास विभाग आणि अन्न व औषध विभागास बरोबर घेऊन बनावट पनीरविरोधात ग्राहक जागरुकता मोहिम सुरु केल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली.

या संयुक्त मोहिमेची फलश्रुति म्हणून आता दुधापासून बनवलेल्या पनीरला ग्राहकांकडून मागणी वाढलेली आहे. शिवाय हॉटेलमध्ये आमच्याकडे ओरिजनल पनीरपासून बनवलेल्या भाज्या उपलब्ध असल्याचे फलक दिसायला सुरुवात झाली असून शेवटी यातूनच शेतकऱ्यांच्या दुधाला अधिक रक्कम देणे दूध संस्थांना शक्य होणार असल्याचे सांगण्यात आले.

''ग्रामीण भागात दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांना प्रमुख अर्थाजर्नाचे साधन आहे. पुढील काळामध्ये राज्यातील दूध व्यवसायातील दूध पावडर प्रकल्प आणि पाऊच पॅकिंग करणाऱ्या सर्व दूध संस्थांबरोबर आपण संयुक्त बैठक घेऊ ही कल्याणकारी संघाची मागणीही मुंडे यांनी मान्य केली आहे. जून महिनाअखेर ही बैठक घेण्याचे नियोजन आहे. त्याचवेळी अन्न व औषध विभागाच्या लॅबोरेटरीज अद्ययावत हव्यात, यावरही त्यांनी सहमती दर्शविली आहे.
- प्रकाश कुतवळ , सचिव,दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ,पुणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT