पुणे

राज्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गृहविभागाने शुक्रवारी रात्री राज्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश काढले. त्यामध्ये तब्बल 449 पोलिस निरीक्षकांच्या राज्यात बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांची चर्चा सुरू होती. अखेर अपर पोलिस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी बदल्यांचे आदेश काढले.

पुण्यातून गेलेले अधिकारी…

अजित लकडे (पुणे शहर ते पिंपरी-चिंचवड), राजकुमार वाघचवरे (पुणे शहर ते सोलापूर शहर), जगन्नाथ कळसकर (पुणे शहर ते ठाणे शहर), अशोक कदम (पुणे शहर ते पिंपरी-चिंचवड), शंकर खटके (पुणे शहर ते नाशिक शहर), गजानन पवार (पुणे शहर ते गुन्हे अन्वेषण), संगीता यादव (पुणे शहर ते गुन्हे अन्वेषण), वैशाली चांदगुडे (पुणे शहर ते गुप्तवार्ता प्रबोधिनी), महेंद्र जगताप (पुणे शहर ते सातारा), ब—ह्मानंद नाईकवाडी (पुणे शहर ते गुन्हे अन्वेषण विभाग).

पुणे शहर, ग्रामीण आणि लोहमार्ग येथे आलेले अधिकारी (कोठून आले)

अब्दुल रेहमान शेख (पुणे शहर) मुदतवाढ, कृष्णा इंदलकर (पुणे शहर – मुदतवाढ), विठ्ठल दबडे (पुणे ग्रामीण ते पुणे शहर), सुरेंद्र माळाळे (औरंगाबाद शहर ते पुणे शहर), नरेंद्र शामराव मोरे (मुंबई शहर ते पुणे शहर), सुभाष भुजंग (जालना ते पुणे शहर), अजय संकेश्वरी (गुन्हे अन्वेषण ते पुणे शहर), धन्यकुमार गोडसे (सातारा ते पुणे शहर), रवींद्र गायकवाड (वर्धा ते पुणे शहर), दत्तात्रय चव्हाण (पुणे शहर मुदतवाढ), , राजकुमार शेरे (गुन्हे अन्वेषण ते पुणे शहर), मनीषा झेंडे (पुणे शहर ते लाचलुचपत विभाग), सुरेशसिंग गौड (लोहमार्ग पुणे ते पुणे शहर), दशरथ पाटील (पालघर ते पुणे शहर), कविदास जांभळे (पुणे शहर ते पोलिस प्रशिक्षण केंद्र नानवीज), चंद्रकांत बेदरे (सांगली ते पुणे शहर), विश्वजित काइंगडे (रायगड ते पुणे शहर), स्मिता वासनिक (पोलिस प्रशिक्षण केंद्र नागपूर ते लोहमार्ग पुणे), गिरीषकुमार दिघावकर (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर), धनंजय पिंगळे (पोलिस प्रशिक्षण केंद्र नानवीज ते पुणे शहर), रवींद्र पाटील (राज्य गुप्तवार्ता विभाग ते पुणे ग्रामीण), दिनेश तायडे (गोंदिया ते पुणे ग्रामीण),संदीप देशमाने (गुप्तवार्ता विभाग ते पुणे शहर), कुमार कदम (गुप्तवार्ता विभाग ते पुणे ग्रामीण), सीमा ढाकणे (पोलिस प्रशिक्षण केंद्र नागपूर ते पुणे शहर), सुनील गवळी (पुणे शहर), आनंदराव खोबरे (सातारा ते पुणे शहर), संतोष पांढरे (ठाणे शहर ते पुणे शहर), संजय कुमार पतंगे (सातारा ते पुणे शहर), नंदकुमार गायकवाड( एटीएस ते पुणे शहर), सुनिता रोकडे (लोहमार्ग मुंबई ते पुणे शहर), मनीषा पाटील, सुरेखा चव्हाण, राहुल जगदाळे, चेतन मोरे (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर), भालचंद्र ढवळे, गुरुदत्त मोरे (पोलिस प्रशिक्षण केंद्र नानीज ते पुणे शहर).

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT