पुणे

टँकर पलटी झाल्यामुळे वाहतूक वळवली बाणेर मार्गे

Laxman Dhenge

हिंजवडी : वाहतुकीच्या कारणामुळे एका पलटी झालेल्या टँकरमुळे शनिवारी वाहतूक बाणेर मार्गे पुणे येथे वळवण्यात आली होती. त्यामुळे दिवसभर वाहतूकीचा अडथळा निर्माण झाला होता.

मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी

हिंजवडी आणि मुंबईच्या दिशेने पुण्याकडे जाणार्‍या वाहतुकीस यामुळे अडथळा निर्माण झाला होता. अखेर काही कालावधीनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. शनिवारी पहाटे 5 च्या सुमारास औंध रोड वरती राजभवन समोर ब्रेमन चौकाकडून विद्यापीठ चौकाकडे जाणार्‍या रोडवर मेट्रोचे कंटेनर येथे पलटी झाला होता. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे काम येथे सुरू होते. यासाठी लागणारे मोठे गल्डर या कंटेनरमध्ये असल्याने वाहतूक काही काळासाठी प्रभावित झाली होती. यात सिमेंटचे गर्डरसह हा कंटेनर पलटी झाला होता. त्याच्यामुळे दोन्हीकडे लेन बंद झालेले आहे. विद्यापीठ चौकाकडून औंधरोडकडे जाणारी वाहतूक बाणेर रोड मार्गे वळविण्यात आली होती.

या वेळी ब्रेमन चौकाकडून विद्यापीठ चौकाकडे जाणारी वाहतूक ब्रेमन चौकातून वळविली आहे. चतु:श्रृगी पोलिस ठाणे गेटमधून हलकी वाहने जात आहेत. सिमेंट गर्डर हजारो टन वजनाचे असल्यामुळे 2 क्रेन यासाठी पाचारण करण्यात आल्या होत्या. या दोन्ही क्रेन मोठया होत्या. मात्र, त्या अपुर्‍या असल्याने आणखी कुमक मागवण्यात आली होती. यासाठी अधिकचे 2 तास कालावधी लागला होता. यामुळे वाहतूक प्रभावित झाली होती. परंतु, शनिवार असल्याने आयटीचे कर्मचारी येथे ये-जा करतात. त्यामुळे हा रस्ता अतिशय महत्वाचा आहे. परंतु, तरीदेखील हा रस्ता बंद असल्याने नागरिकांचे हाल झाले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT