पुणे : पुढारी वृत्तसेवा: मोहरम सणानिमित्त शनिवारी (दि. 29) शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. ताबूत, पंजे छबिने यांच्या विसर्जन मिरवणुका निघतात. त्या वेळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून हा बदल करण्यात आला आहे. या वेळी नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे. मुख्य मिरवणूक शनिवारी दुपारी तीन वाजता श्रीनाथ टॉकीज येथून निघणार आहे. पुढे ती दत्त मंदिर बेलबाग चौक, बुधवार चौक, जिजामाता चौक, शनिवारवाडा फुटक्या बुरुजास वळसा घालून शनिवारवाडा समोरील गाडगीळ पुतळा चौक-डेंगळे पूल- गाडीतळ चौक-रेल्वे पुलाखालून आरटीओ चौक ते संगम ब्रिज विसर्जनाचे ठिकाणी संगमघाट विसर्जन स्थळ आहे.
लष्कर परिसरातील मिरवणूक दुपारी बारा वाजता 684 ताबूत, पंजे ताबूत स्ट्रीट येथे एकत्र होऊन, पुढे बाटलीवाला बगीचा, सरबतवाला चौक, बाबाजान दर्गा, भोपळे चौक, गावकसाब मशिद, एम. जी. रोडने कोहिनूर चौक, भगवान महावीर चौक, नाझ हॉटेल चौक, बुटी स्ट्रीटने बाटलीवाला बगीचा चौक या ठिकाणी दोन वाजताच्या सुमारास धार्मिक कार्यक्रमासाठी थांबतात. त्यानंतर पुढे नेहरू मेमोरियल हॉल, रहिम पेट्रोल पंप, जुने समर्थ पोलिस स्टेशन मार्गे, पॉवर हाऊस चौक, के.ई.एम. हॉस्पिटल समोरून अपोलो टॉकीज चौक, दारूवाला पूल, फडके हौद चौक, मोती चौक, सोन्या मारुती चौक, विजय मारुती चौक ते बेलबाग चौक मार्गाने श्रीनाथ सिनेमा येथे येऊन मुख्य मिरवणुकीत सामील होतात.
खडकी भागातून निघणारी मिरवणूक सायंकाळी पावणेसात वाजता ताबूत मिरवणूक बोपोडी चौक येथे येऊन मुंबई-पुणे रोडने दापोडी नदीकिनारी विसर्जन होणार आहे. पाटील इस्टेट गल्ली नं. 10 ची मिरवणूक दुपारी दोन वाजता रेशीम विभाग व दूध डेअरीजवळील ताबूत मिरवणुकीने पाटील इस्टेट या ठिकाणी येऊन पुन्हा परत जागेवर येणार आहेत. तसेच पाटील इस्टेट गल्ली नं. 10 येथील ताबूत मिरवणूक संगम ब्रिजz या ठिकाणी येऊन विसर्जित होणार आहे.
इमामवाडा येथून निघणारी मिरवणूक सकाळी साडेदहा वाजता इमामवाडा लष्कर ते आगाखान कंपाउंड ते परत इमामवाडा मार्ग रहिम पेट्रोल पंप, नेहरू मेमोरियल चौक, पोलिस आयुक्त कार्यालयासमोरून जनरल पोस्ट ऑफिस चौक, साधू वासवानी चौक, 13 कॅनॉट रोड, आगाखान कंपाउंड येथे धार्मिक कार्यक्रम होऊन परत उलट मार्गाने इमामवाडा येथे विसर्जन होणार आहे. विसर्जन मार्गावरील वाहतूक आवश्यकतेनुसार इतर मार्गावर वळवली जाणार आहे किंवा ती बंद करण्यात येणार आहे. मिरवणुका पुढे मार्गस्थ होताच रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :