मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत आजपासून बदल Pudhari
पुणे

Pune traffic update: मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत आजपासून बदल

वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन रविवारपासून (दि. 31 ऑगस्ट) शहराच्या मध्य भागातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत. लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता वाहतुकीस बंद केले जाणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. (Latest Pune News)

घरगुती गणपती आणि गौरी विसर्जनानंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींच्या दर्शनासाठी आणि देखावे पाहण्यास गर्दी होते. शहराच्या मध्यभागात गर्दी होण्याच्या शक्यता असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.

अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता अन्य सर्व वाहनांसाठी सायंकाळी पाचनंतर मध्यभागातील प्रमुख रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. गर्दी ओसरेपर्यंत मुख्य रस्ते बंद असतील. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.

वाहतुकीस बंद असणारे रस्ते पुढीलप्रमाणे- लक्ष्मी रस्ता (हमजेखान चौक ते टिळक चौक), छत्रपती शिवाजी महाराज रस्ता (गाडगीळ पुतळा चौक ते देशभक्त केशवराव जेधे चौक, स्वारगेट), बाजीराव रस्ता (पूरम चौक ते अप्पा बळवंत चौक), टिळक रस्ता (मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ते हिराबाग चौक)

वाहतुकीस बंद असणारे अंतर्गत रस्ते पुढीलप्रमाणे- सिंहगड गॅरेज (घोरपडे पेठ ते राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक), दिनकरराव जवळकर चौक ते पायगुडे चौक ते हिराबाग चौक, कै. अनंत बाळकृष्ण नाईक पथ ते टिळक रस्ता, सणस रस्ता (गोटीराम भैय्या चौक, मंडई ते गोविंद हलवाई चौक), पानघंटी चौक ते गंज पेठ पोलीस चौकी, गंज पेठ ते वीर लहुजी वस्ताद तालीम चौक, गायकसाब मशीद ते सेंटर स्ट्रीट पोलिस चौकी (लष्कर), कोहिनूर चौक ते बाबाजान चौक (लष्कर), जेधे प्रासाद रस्ता, सुभानशाह दर्गा, पार्श्वनाथ चौक, शास्त्री चौक ते सोन्या मारुती चौक, गुरुनानक पथ ते हमजेखान चौक (देवजीबाबा चौक, गणेश पेठ), कोहिनूर चौक ते बाबाजान चौक (लष्कर), गावकसाब मशिद ते सेंट्रल स्ट्रीट पोलिस चौकी, (लष्कर)

वाहने लावण्यास मनाई

शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते मंडई, मंडई ते शनिपार, शनिपार ते फुटका बुरूज, अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक या भागात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. गणेशोत्सवात रविवारपासून 5 सप्टेंबरपर्यंत रात्री गर्दी ओसरेपर्यंत कुमठेकर रस्ता, फडके हौद रस्ता, सिंहगड गॅरेज ते महापालिका कार्यशाळा (घोरपडे पेठ), लष्कर भागातील कोहिनूर हॉटेल चौक ते भगवान महावीर चौक (महात्मा गांधी रस्ता) या मार्गावरील एकेरी वाहतुकीचे आदेश गरजेनुसार तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात येणार आहेत, असे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी कळविले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT