पुणे

पूर्व हवेलीत सलग दुसर्‍या दिवशी वादळी पाऊस ; कोट्यवधीच्या मालाचा चिखल

Laxman Dhenge
[author title="माणिक पवार" image="http://"][/author]
उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा : पूर्व हवेली तालुक्यात सलग दुसर्‍या दिवशी झालेल्या वादळी पावसाने सोरतापवाडी व आळंदी म्हातोबा या परिसरात नर्सरी व्यावसायिकांना चांगलाच दणका दिला. वादळाने या परिसरातील 30 हून अधिक हरितगृहांचे प्रचंड नुकसान झाले. या हरितगृहांतील विक्रीसाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा माल मातीमोल झाला आहे.
पूर्व हवेली तालुक्याला सलग दुसर्‍या दिवशी मान्सूनपूर्व वळीव पावसाने चांगलेच झोडपले आहे. वळती, शिंदवणे, तरडे व आळंदी म्हातोबा या गावच्या शेत पिकाला व खासगी मालमत्तेला तडाखा दिल्यानंतर दुसर्‍या दिवशी सोमवारी
(दि. 20) वादळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. सायंकाळी 6 नंतर वादळी वार्‍याला प्रचंड वेग असल्याने सोरतापवाडी, आळंदी म्हातोबा या परिसरात अनेक वर्षांपूर्वीची झाडे जमीनदोस्त झाली. नर्सरी व्यावसायिकांची हरिगृहांची पडझड होऊन पावसाचा मारा रोपवाटिकांना बसून त्यांचे नुकसान झाले.
सोरतापवाडी व आळंदी म्हातोबा गावातील तब्बल 30 हून अधिक हरितगृहांना झळ बसून कोट्यवधीच्या मालाचा चिखल झाला. सोरतापवाडी गावात वादळी पावसाने दोन घरांचे नुकसान झाले आहे. एका गोठ्याचे पत्रे उडाले आहेत. एक सोलर सेट वादळाने उडाला आहे. आळंदी म्हातोबा येथे एका घरावर वीज कोसळली. सुदैवाने घरात कोणीच नसल्याने अनेकांचा जीव वाचला आहे.
दरम्यान, या आपत्तीची माहिती मिळताच आमदार अशोक पवार यांनी या भागाला भेट दिली. त्यांनी अनेक नर्सरी व्यावसायिकांशी संवाद साधून त्यांना मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यासह जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी या भागातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. हवेलीच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनीही या भागाला भेट देऊन महसूल व कृषी विभागाला सर्व पंचनामे पूर्ण करण्याचा सूचना दिल्या आहेत.

एका व्यावसायिकाचे पाच लाखांहून अधिक नुकसान

वादळी पावसाने हरितगृहे जमीनदोस्त झाल्याने किमान एका छोट्या व्यावसायिकाचे पाच लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. या परिसरात 10 गुंठ्यांपासून दोन एकरांपर्यंत हरितगृहे आहेत. या वादळाने आळंदी म्हातोबा येथील डी. पी. जवळकर या एकाच व्यावसायिकाचे तब्बल दीड कोटीचे नुकसान झाले आहे. त्यांनी परदेशातून रोपवाटिका आणून विक्रीसाठी तयारी केली होती.
दरम्यान, या आपत्तीची माहिती मिळताच आमदार अशोक पवार यांनी या भागाला भेट दिली. त्यांनी अनेक नर्सरी व्यावसायिकांशी संवाद साधून त्यांना मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यासह जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी या भागातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. हवेलीच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनीही या भागाला भेट देऊन महसूल व कृषी विभागाला सर्व पंचनामे पूर्ण करण्याचा सूचना दिल्या आहेत. दरम्यान वळती, शिंदवणे आणि सोरतापवाडीतील गरजूंना प्रदिप कंद यांनी वैयक्तिक एक लाख रुपयांची मदत दिली.
हेही वाचा 
SCROLL FOR NEXT