पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर महामार्ग, दिवे घाट आणि शहरात तीन वेगवेगळ्या अपघातांत तिघे ठार झाले आहेत. मृतांमध्ये 15 वर्षाचा मुलगा, तरुण व ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे. आईसोबत दुचाकीवरून जात असताना दुचाकीला दिलेल्या धडकेत पंधरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना दिवे घाटात घडली. साहिल विकास तांबोळी (15, सासवड) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याची आई राजश्री तांबोळी (35) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या एलाईट चौकात मित्रासोबत जाणार्या दुचाकीस्वार तरुणाला कंटेनरने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना 1 सप्टेंबरला सकाळी आठच्या सुमारास घडली. शुभम रमेश लेचरूड (23, रा. डाळींब, ता. दौंड) असे अपघाती मृत्यू झालेल्याचे नाव आहे. शुभम आणि त्याचा मित्र आकाश म्हस्के हे दुचाकीवरून डाळिंब येथे निघालेले असताना शुभम दुचाकी चालवत होता.
तिसर्या अपघातामध्ये पिण्याचे पाणी घेऊन रस्ता ओलांडणार्या ज्येष्ठ नागरिकाला बुलेटने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. धोंडीराम चिंधे (वय 63, रा. लक्ष्मी कॉलनी, हडपसर) यांचा अपघातात मृत्यू झाला. याप्रकरणी बुलेट चालकावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पंधरा नंबर चौकाजवळ 1 सप्टेंबरला दुपारी साडेचारच्या सुमारास घडला. याबाबत अपर्णा चिंधे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अल्पवयीन बुलेट चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा :