गोखळीतील गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक लक्ष्मण हरणावळ यांचे अपहरण Pudhari
पुणे

Indapur Kidnapping Case: गोखळीतील गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक लक्ष्मण हरणावळ यांचे अपहरण

महिन्याला एक लाख रुपयांची मागितली खंडणी संशयित पोलिसांच्या ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

Gurukul Founder Kidnapped for Ransom in Indapur

इंदापूर: इंदापूर तालुक्यातील गोखळी येथील गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक लक्ष्मण हरणावळ यांचे अपहरण करून लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी करणार्‍या तीन संशयितांना इंदापूर पोलिसांनी काही तासांतच अटक केली. शिवम बाळू डोंबाळे, वैभव हरिभाऊ माळवे आणि संकेत आप्पा जळक (सर्वजण रा. तरंगवाडी, ता. इंदापूर) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

याबाबत लक्ष्मण हरणावळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवारी (दि. 3) ते केस कापण्यासाठी जात होते. या वेळी वरील तिघांनी त्यांना रस्त्यावर अडवून ‘तुम्ही आम्हाला महिन्याला एक लाख रुपये द्या, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला बघून घेऊ,’ अशी धमकी दिली. त्यानंतर लक्ष्मण हरणावळ हे केस कापण्यासाठी तरंगवाडी येथील दुकानात गेले. (Latest Pune News)

पुन्हा संशयितांनी हरणावळ यांना ‘गुरुजी तुम्हाला पैसे द्यायला जमतात का नाही?’ असे म्हणत एक लोखंडी मूठ असलेले फायटर काढून तुम्हाला कायमचा संपवून टाकेन, अशी धमकी देत हरणावळ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली.

नंतर जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रल्हाद देवकाते यांच्या खडीक्रशरवर घेऊन जाऊन हरणावळ यांच्या खिशातील पाच हजार रुपये काढून घेतले.

या घटनेची लक्ष्मण हरणावळ यांनी फिर्याद देताच इंदापूर पोलिसांनी तत्काळ संशयितांना अटक केली. या घटनेचा तपास इंदापूरचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गर्शनाखाली पोलिस हवालदार अक्षय गोफणे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT