

Police case in Pune relationship violence
पुणेः प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने एका तरुणीला केस पकडून हाताने मारहाण करण्याची घटना शिवाजीनगर भागात घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी शिवसागर मदन गौड (वय 25, रा. मंगळवार पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत एका तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार फेब्रुवारी ते 2 जून या कालावधीत घडला आहे. आरोपी गौड आणि तरुणी यांच्यात प्रेमसंबध होते. गौड याच्या वर्तनामुळे तरुणीने त्याला प्रेमसंबध ठेवण्यास नकार दिला. तरुणीने त्याला झिडकारल्यानंतर गौडने तिला मारहाण केली.(Latest Pune News)
मोबाइलवर काढलेली छायाचित्रे समाजमाध्यमांमध्ये प्रसारित करण्याची धमकी दिली, असे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस हवालदार बांबळे तपास करत आहेत.
हडपसरमध्ये मुलीला मारहाण
हडपसर भागात एका मुलीने प्रेमसबंध ठेवण्यास नकार दिल्याने तिला धमकावून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी ज्ञानेश्वर रमेश शिंदे (वय 20, रा. हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, 16 वर्षीय मुलीने याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक कोलेवाड तपास करत आहेत.