पुणे

पुणे : दुकानदारांकडे हप्ता मागणारे तिघे अटकेत

अमृता चौगुले

पुणे : हडपसर भागात दुकानदारांकडे दरमहा हप्ता मागून दहशत माजविणार्‍या तिघांना पोलिसांनी अटक केली. या परिसरात व्यवसाय करायचा असेल, तर दरमहा हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी टोळक्याने दिल्याचे समोर आले आहे. अजय साळुंके, शुभम गवळी, सुदाम साळुंके, अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत हिराराम चेनाराम देवासी (वय 34, रा. शेवाळवाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिराराम यांचे शेवाळवाडी भागात चैतन्य स्वीट मार्ट मिठाई विक्रीचे दुकान आहे. आरोपी अजय साळुंके, शुभम गवळी, साळुंके मिठाई विक्री दुकानात आले.

त्यांनी बाकरवडी, पाणी, शीतपेयाची बाटली घेतली. देवासी यांनी त्यांच्याकडे पैसे मागितले. तेव्हा 'तुम्ही बाहेरून येऊन व्यवसाय करता. व्यवसाय करायचा असेल, तर दरमहा पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल,' अशी धमकी दिली. आरोपींनी कोयते उगारून या भागात दहशत माजविली. या भागातील प्रत्येक दुकानदाराने दरमहा हप्ता न दिल्यास जिवे मारू. या भागात व्यवसाय करू दिला जाणार नाही, अशी धमकी देऊन दहशत माजविली. सहायक पोलिस निरीक्षक दाभाडे तपास करीत आहेत.

बसमध्ये चढताना मुलीशी अश्लील चाळे

हडपसर येथील गाडीतळ परिसरात 16 वर्षांची मुलगी बसमध्ये चढताना तिच्यासोबत अश्लील चाळे करणार्‍यावर विनयभंग तसेच बाललैंगिक अत्याचारानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार होत असताना तिने त्याला प्रतिकार केला असता, आरोपीने तिचा पुन्हा विनयभंग केला. या प्रकरणी प्रतीक रामबृज जैस्वाल (20, रा. बरसेरया, आजमगड, उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत एका 16 वर्षीय पीडितेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT