पुणे

पुणे : पतीने दुसरे लग्न केल्याने कॅबला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

अमृता चौगुले

पुणे : पतीने दुसरे लग्न केल्याच्या कारणातून झालेल्या वादात, पतीला अद्दल घडविण्यासाठी त्याच्या कंपनीच्या प्रवासी कॅबला बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा ईमेल महिलेने पाठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी कोंढवा खुर्द येथील 33 वर्षीय महिलेला अटक केली आहे. संबंधित महिला ही उच्चशिक्षित आहे. याबाबत खराडी येथील ऑल स्टेट कंपनीच्या व्यवस्थापकाने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कंपनीत 11 जून रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑल स्टेट कंपनीमध्ये आरोपी महिलेचा पती कमाला आहे.

त्यांनी दुसरे लग्न केले. त्यातून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. पतीची नोकरी जाण्याच्या हेतूने तिने पतीचा मेल आय डी वापरून फिर्यादीच्या कंपनीच्या मेलवर ईमेल पाठविला. त्यात कंपनीची प्रवासी कॅब बॉम्बने उडविण्याची धमकी दिली होती. तसेच कंपनीचे ऑफिस व कॅब उडविण्याची धमकी दिली. हा मेल पाहताच फिर्यादी यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने कंपनीच्या सर्व कॅबची बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून तपासणी केली. त्यात काहीही आढळून आले नाही. त्यानंतर शोध घेतला असता, आरोपी महिलेने हा मेल केल्याचे उघड झाल्याने तिला पोलिसांनी अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक लांडगे तपास करीत आहेत.

हे ही वाचा : 

SCROLL FOR NEXT