पुणे

Mission Admission : यंदा 39 हजारांवर जागा रिक्तच

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तीन नियमित आणि सात विशेष फेर्‍या झाल्यानंतर 20 ते 25 ऑक्टोबरदरम्यान दैनंदिन गुणवत्ता फेरी अर्थात सतत विशेष फेर्‍यांचे आयोजन करण्यात आले. या सर्व फेर्‍यांमध्ये मिळून यंदा 78 हजार 103 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर, प्रवेशाच्या तब्बल 39 हजार 647 जागा रिक्तच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. दैनंदिन गुणवत्ता फेरीमध्ये विद्यार्थ्यांना दररोज प्रवेशाची संधी देण्यात आली होती. परंतु, विद्यार्थ्यांनी यंदा अकरावी प्रवेशाकडे सपशेल पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे.

यंदाच्या प्रवेशप्रक्रियेत 330 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीभूत प्रवेशांसाठी 1 लाख 1 हजार 703 जागा कॅपअंतर्गत आणि कोटा प्रवेशाच्या 16 हजार 47 अशा 1 लाख 17 हजार 750 जागा प्रवेशांसाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी 1 लाख 2 हजार 787 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. अकरावी प्रवेशप्रक्रियेत कोटा आणि केंद्रीभूत प्रवेश फेर्‍यांतर्गत एकूण 78 हजार 103 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. दर वर्षी दैनंदिन फेरी झाल्यानंतर अकरावी प्रवेशप्रक्रिया संपली असल्याचे जाहीर करण्यात येते. त्यामुळे यंदादेखील अकरावी प्रवेशप्रक्रिया आता संपल्यातच जमा झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT