बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा : बिबवेवाडी येथील पोकळेवस्ती विद्यानिकेतनजवळील मुख्य रस्त्यावर पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे काम बर्याच दिवसांपासून रेंगाळले आहे. त्यामुळे या परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना नागरिकांना, रहिवाशांना सोसायटीतील सदस्यांना रात्रंदिवस त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी रस्ता खोदताना रात्री-अपरात्री जेसीबीचा मोठा आवाज होतो तसेच रस्ता खोदून तसाच ठेवल्यामुळे वाहतुकीलाही अडथळा होत आहे. याबाबत वारंवार सांगूनही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आंदोलनाच्या तयारीत आहेत.
बिबवेवाडी परिसरातील रखडलेल्या कामांमध्ये संतोषनगर पंपिंग स्टेशनमधून कात्रज-कोंढवा रस्त्याने अपर सुपर बस स्टॉप, महेश सोसायटी ते गंगाधाम आई माता मंदिरा पाठीमागील टेकडीपर्यंत नव्याने बांधण्यात आलेल्या पंपिंग स्टेशनला पाणी नेले जाणार आहे. समान पाणीपुरवठा प्रकल्पामधून हे काम सुरू आहे. महेश सोसायटी चौकात नागरिकांनी अडवल्यामुळे या कामात दिरंगाई झाली आहे, तर काही ठिकाणी या कामाला विरोध आहे. त्यामुळे काम रेंगाळत चालले आहे, असे कनिष्ठ अभियंता राजेश बनकर यांनी सांगितले.
…तर काम दोन महिन्यांत
सतत काम चालू ठेवले तर पुढील दोन महिन्यांत हे काम पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. समान पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत या ठिकाणच्या पाण्याचा बिबवेवाडी गावठाण, अपर डेपो परिसर कोंढवा, तरवडेवस्ती, दोराबजी मॉल शहराच्या पूर्व भागातील काही ठिकाणी या पाण्याचा उपयोग होणार आहे. नागरिकांचा काही ठिकाणी असलेला विरोध हे काम रखडण्यामागचे कारण असले तरी प्रशासकीय पातळीवरसुद्धा कामाला विलंब होत
विद्यानिकेतन शाळा ते पोकळेवस्तीच्या रस्त्यावर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून रस्ता खोदून पाण्याची पाइपलाइन
टाकण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त आहेत. अधिकार्यांना निवेदन देऊनही जर त्यात सुधारणार नाही झाली तर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल.
– राहुल दिघे, मनसे कार्यकर्तेबिबवेवाडीतील या ठिकाणचे काम कठीण आहे. पाण्याची गरज लक्षात घेता अत्यावश्यक काम असल्यामुळे ते होणे गरजेचे आहे. याबाबत थोडाफार उशीर होणार आहे. नागरिकांची गैरसोय होत असल्यास त्यात सुधारणा करू.
– रमेश बनकर, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका
हे ही वाचा :