Pune Weather Update Today:
पुणे: गेले दोन महिने शहराचे तापमान प्रामुख्याने शिवाजीनगर 39 ते 42 अंशांवर जात होते. यात लोहगावचा पारा सातत्याने 43 अंशांवर होता. मात्र शनिवारी रात्री आलेल्या अहवालात शहराचे तापमान दीड ते दोन अंशांनी घटल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.
यंदा मार्च, एप्रिल हे दोन महिने पुणेकरांना प्रचंड उष्णतेचे गेले. मे महिन्यातही घरात बसवत नाही इतका उकाडा आहे. मात्र अवघ्या बारा तासांत वातावरणात किंचित बदल झाला आहे. शिवाजीनगरचे तापमान प्रथमच 40 ते 41 अंशांवरून 39 तर लोहगावचे 43.2 वरून 41 अंशांवर खाली आले आहे. तसेच इतर भागातील पारा 37 ते 38 अंशांवर खाली आला आहे. (Latest Pune News)
आजपासून पावसाचा अंदाज
शहरात सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यामुळे 4 ते 9 मे दरम्यान शहरात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
शनिवारचे तापमान
शिवाजीनगर 39 (25.3), पाषाण 39 (24.9), लोहगाव 41 (25.6), चिंचवड 38 (25.8), लवळे 37 (24.9), मगरपट्टा 39 (27.2), एनडीए 37 (21), कोरेगाव पार्क 39 (26.7)