भोर: टिटेघर ( ता. भोर ) येथील विद्यमान सरपंच शशिकला नारायण नवघणे यांच्यासह विविध पदाधिकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. रामबाग, भोर येथील कार्यालयात मंगळवारी (दि. 20) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार शंकर मांडेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी केलेल्या विकासकामांवर प्रभावित होऊन अनेक पदाधिकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. (Latest Pune News)
यामध्ये टिटेघर ग्रामपंचायतीच्या सरपंच शशिकला नारायण नवघणे, माजी सरपंच बाप्पू भाऊ नवघणे यांच्यासह नारायण भिकू नवघणे, कृष्णा सणस, अंकुश शिंदे यांचा समावेश आहे. यावेळी विकास सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत पिसाळ, माजी सरपंच दिनकरराव नवघणे, बापू निगडे, शंकरराव तावरे, ज्ञानोबा भोईटे, दत्तात्रेय नवघणे, संपत निगडे, संतोष नवघणे, संदीप नवघणे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या माध्यमातून गावातील उर्वरित विकास कामांच्या निधीसाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे शिवतरे यांनी या वेळी सांगितले.