पुणे

तक्रार देण्यास निघालेल्या मालकाला भोसकले; कामगारास अटक

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कामगाराची तक्रार देण्यासाठी निघालेल्या मालकाला कामगाराने भर चौकात भोसकले. ही घटना सोमवारी (दि. 25) सायंकाळी आठच्या सुमारास भूमकर चौक, वाय जंक्शन, वाकड येथे घडली. शिवाप्पा आप्पा अण्णा अडागळे (42, रा. मुकाई चौकाजवळ, किवळे), असे जखमी मालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दिगंबर शिवाजी गायकवाड (28, रा. डुडुळगाव, आळंदीरोड, ता. हवेली) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिगंबर हा फिर्यादी यांच्या ट्रकवर चालक म्हणून काम करत होता. दरम्यान, त्याला कामावरून काढण्याचा फिर्यादी विचार करत होते. दरम्यान, आरोपी फिर्यादी यांचा आयशर टेम्पो घेऊन जात होता. त्या वेळी फिर्यादी यांनी दिगंबर गायकवाड याला टेम्पो घेऊन जाण्यास विरोध केला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. त्या वेळी दिगंबर याने फिर्यादी शिवाप्पा यांना शस्त्राने डोक्यात मारून त्यांना जखमी केले.

याबाबत तक्रार देण्यासाठी शिवाप्पा पोलिस ठाण्यात जात होते. दरम्यान, भूमकर चौकातील वाय जंक्शन येथे आले असता आरोपी दिगंबर याने फिर्यादी यांना अडवून त्यांना धारदार शस्त्राने जीवे मारण्याच्या उद्देशाने भोसकले. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT