पुणे

ख्रिसमसनिमित्त बाजारपेठ सजली; जय्यत सेलिब्रेशनची तयारी

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : ख्रिसमस म्हणजे प्रभू येश ख्रिस्त यांचा जन्मदिवस हा ख्रिस्तीबांधवांचा मोठा सण आहे. जगभरात हा सण 25 डिसेंबर रोजी धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी जय्यत तयारी करत असल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे. ख्रिसमसनिमित्त विविध वस्तूंनी बाजारपेठ सजली असून, ख्रिस्तीबांधवांनी सणाची जय्यत तयारी सुरू केली आहे. शहरातील बाजारपेठा, दुकाने व मॉल्स विविध प्रकारांच्या वस्तू, सांता टोपी, बेल्स, ख्रिसमस ट्री, गिफ्ट पॅकेजसह सजावटीच्या साहित्यांनी सजली आहेत.

ख्रिसमस सर्व जाती-धर्मातील नागरिकांकडून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठा, दुकाने आणि ख्रिसमसप्रेमी सांताक्लॉजच्या स्वागताकरिता सज्ज झालेले आहेत. लहान मुलांसाठी बाजारात सांताक्लॉजसारखे ड्रेस, कानटोपी, ग्लोज, शूज, पोतडी बॅग्जही आल्या आहेत. बच्चे कंपनीत सांताक्लॉजचे खास आकर्षण असून चॉकलेट, गिफ्ट घेऊन येणार्‍या सांताक्लॉजचे आकर्षक मुखवटे, टोपी यांची खरेदी होत आहे. घरातील सजावटीबरोबरच ख्रिसमस ट्रीच्या सजावटीकरिता लागणार्‍या वस्तू, चांदण्या, चॉकलेट्स, झालर, बेल्स, सांताक्लॉजच्या मूर्ती, आकाशकंदील, रोषणाई व सजावटीचे साहित्य, भेटवस्तू यांनी अनेक दुकाने सजली असून, खरेदीसाठी स्ट्रीट शॉपिंग आतापासूनच केली जात आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT